भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार वि. मनसे असा राजकीय सामना नुकताच रंगला होता. पण त्याच सामन्याचा पुढचा डाव राजकारणाच्या पीचवर रंगलाय. यावेळी शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे लँड स्कॅमचे बादशाह आहेत, असा गंभीर आरोप आशिष शेलारांनी केलाय. भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शेलार बोलत होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.शेलारांच्या या भाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली... पाहूयात नेमकं काय घडलं?
भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना अनेकदा निशाणा बनवलं, त्यांच्यावर अनेक आरोप केले.. शेलक्या शब्दात टीका केली..अनेक उपमा,विशेषणं दिली आहेत.
त्यात आता आणखी एका आरोपाची, एका नव्या विशेषणाची भर पडलीय..
मुंबईतील जमीन घोटाळ्याचा बादशाह अशा शब्दात आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर शेरेबाजी केली आहे. त्यांच्या नावाने ही ऑडियो क्लिप चांगलीच चर्चेत आहे.